तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जाची छानणी बुधवार दि. 30 ऑक्टोर रोजी करण्यात येवुन एकूण 54 उमेदवारांनी 87 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यामध्ये तुळजापूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्जाची छानणी बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी करण्यात येवुन एकूण 54 उमेदवारांनी 87 नामनिर्देशनपत्रे दाखल केली होती. त्यामध्ये 51 उमेदवारांचे 77 नामनिर्देशनपत्र मंजूर झाले. तर 3 उमेदवारांचे 10 नामनिर्देशनपत्र विविध कारणांमुळे नामंजूर करण्यात आले. उमेदवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे. त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
तुळजापूर विधानसभा निवडणुक दुरुंगी होईल असे वाटत असताना बहुरंगी होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. भाजपचे विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील, काँग्रेस नेते मधुकर चव्हाण अपक्ष म्हणून तर महाविकास आघाडी तर्फ काँग्रेसकडुन अँड. धिरज पाटील यांच्या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातुन जीवन गोरे, सपाकडुन देवानंद रोचकरी, वंचितकडुन डाँ. स्नेहलता सोनकाटे, प्रहारकडुन अण्णासाहेब दराडे, बंजारा समाजाचा वतीने प्रकाश चव्हाण, मुस्लीम समाजाचा वतीने अमीर शेख, अशोक जगदाळे, मराठा समाज मनोज जरांगेकडुन महंत तुकोजीबुवा यांच्यासह इतर उमेदवार मैदानात उतरले आहेत.
यंदा बंडखोर उमेदवारांची संख्या मोठी असल्याने चुरस वाढली आहे. तुळजापूर मतदारसंघात बंडखोरी करुन माजी आमदार मधुकरराव चव्हाण, राष्ट्रवादी
काँग्रेसच्या (शरद पवार गट) तर्फे जीवनराव गोरे हे दिग्गज मैदानात उतरले आहेत.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघ
एकूण प्राप्त नामनिर्देशनपत्र -87, एकूण उमेदवार - 54, वैध नामनिर्देशन - 77, अवैध नामनिर्देशन - 10
वैधरित्या नामनिर्देशित उमेदवार- 51, नामनिर्देशन फेटाळले उमेदवार - 3.