परंडा (प्रतिनिधी) - विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आज येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय्य विभागाची बैठक जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली.
माजी आमदार राहुल मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात गाव तिथे घोंगडी बैठक आयोजित करण्यात येणार असून पक्ष्याची विचारधारा समजतील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोच करून महाविकास आघाडीच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे यांनी केले आहे.
यावेळी जिल्हा सरचिटणीस घनश्याम शिंदे तालुका अध्यक्ष भाऊसाहेब ओहाळ, नागनाथ थोरात, विश्वास माने,राजेंद्र शिंदे, युवराज सोनवणे, संकेत कांबळे, दशरथ चाबुकस्वार, हरी साळवे, सोहेल बेग, युवराज भोसले, सौ.रत्नमाला निकाळजे, लक्ष्मी सरवदे, रमेश गायकवाड, बबन काळे बाळू चौधरी, हिरामण गायकवाड, अशोक जाधव, सचिन भोसले, राहुल केंगार, सुनील सुरवसे, राजाभाऊ डावरे, अजय बनसोडे, रुपेश बनसोडे, सिध्दार्थ वाघमारे, प्रतिक बनसोडे, अभिजित कांबळे, ऋषीकेश बनसोडे, अभिजित नलवडे, सौरभ बनसोडे यांच्या सह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.