परंडा (प्रतिनिधी) - येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय परंडा येथे दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी परंडा भूम वाशीचे माजी आमदार कै. ज्ञानेश्वर पाटील यांचे दिनांक 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी निधन झाल्याने त्यांना संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले
होते.
यावेळी प्राचार्य डॉ.सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ. महेश कुमार माने, प्रा. डॉ. हरिश्चंद्र गायकवाड, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख, प्रा. डॉ. गजेंद्र रंदिल उपस्थित होते.ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचे या संस्थेस मोठे योगदान लाभले असून त्यांच्यामुळे या महाविद्यालयास विज्ञान शाखा मिळाली असल्याने अनेक विद्यार्थी विज्ञान विभागातून आपल्या करिअरच्या संधी उपलब्ध करून घेत आहेत.भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी महाविद्यालयातील कनिष्ठ वरिष्ठ विभागाचे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले होते.