उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहर व परिसरात गुरुवारी सांयकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे शहराबाहेरून वाहणाऱ्या उमरगा नदीमध्ये रात्री 58 वर्षीय इसम वाहुन गेला. त्याच्या शोध गुरुवारी रात्री व शुक्रवारी (दि. 4) दिवसभर करूनही लागु शकला नाही. या शोधकार्यात आपत्ती व्यवस्थापन पथक, पोलीस, नगर परिषद प्रशासन व महसुल विभाग सहभागी झाले आहेत.

उमरगा शहर व परिसरात गुरुवारी सांयकाळी जोरदार पाऊस झाला. पावसाने थोड़ी विश्रांती घेतल्या नंतर बाबुराव तुळशीराम सुरवसे हे उमरगा कोरेगाव रोडवरून उमरगा शहराबाहेरुन वाहनाऱ्या उमरगा नदीच्या पुलावर स्कुटीवरून शेताकडे जात असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ते स्कुटीसह पाण्यात वाहुन गेले. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागे असणारे शितल स्वामी हे बुलेटवरून जात असताना पाण्यात अडकून पडले. त्याचवेळी महादेव गल्लीतील काही तरुण तेथे पाणी पाहण्यासाठी आले असता त्यांनी शितल स्वामी यांना दोरीच्या साहाय्याने रिस्कयू करीत पाण्यातून बाहेर काढले. 

यावेळी त्यांनी बाबुराव सुरवसे हे पाण्यात वाहून गेल्याचे सांगितले. त्यानंतर नागरिकांनी, पोलिसांनी नगर परिषद प्रशासनाने रात्री उशिरा पर्यंत नदीच्य्‌ा बाजूने शोध कार्य सुरु केले पण सुरवसे यांचा शोध लागू शकला नाही. त्यात रात्रीची वेळ असल्याने अंधारात शोध घेणे शक्य नव्हते.शुक्रवारी सकाळपासूनच पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी पुढाकार घेतं आपल्या पोलिसांना नदीत उतरूवून शोध सुरु केला. तर काही तरुणांनी ही पाण्यात उतरत शोध घेतला. यांचवेळी तहसीलदार गोविंद येरमे व महसूल विभागाचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते. धाराशिव येथून आपत्ती व्यवस्थापनचीं पथक 12 वाजता पोहचले व त्यांनंतर पथकतील जवान व पोलिसांनी खोल पाण्यात शोध सुरु केला पण सायंकाळ पर्यंत बेपत्ता बाबुराव सुरवसे यांचा शोध लागू शकला नाही. आपत्ती व्यवस्थापन पथक,पोलीस प्रशासन,महसूल विभाग, नगर परिषद प्रशासन शोधकार्यात सहभागी झाले होते. तर विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक दिवसभर मोठ्या संख्येने घटनास्थळी हजर होते.

 
Top