नळदुर्ग (प्रतिनिधी)- युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 17 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथे चैतन्य मुकबधिर शाळेतील 25 विद्यार्थ्यांना दिवाळीसाठी नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.
प्रसिद्ध उद्योगपती आणि युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांचा वाढदिवस दि. 17 ऑक्टोबर रोजी नळदुर्ग येथे युनिटीच्या वतीने साजरा करण्यात आला. यावेळी चैतन्य मुक बधिर शाळेतील 25 विद्यार्थी आणि विद्यार्थीनीना दिवाळी साठी भेट म्हणुन नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी सर्व मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता.
या कार्यक्रमास पत्रकार विलास येडगे, शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे, माजी नगरसेवक सुधीर हजारे, डॉ. आंबेडकर इंग्लिश स्कुलचे अध्यक्ष मारुती खारवे, भाजपाचे माजी शहरअध्यक्ष पद्माकर घोडके, जेष्ठ नागरीक बंडप्पा कसेकर, सामाजिक कार्यकर्ते अमर भाळे, पत्रकार उत्तम बनजगोळे,दिशा पतसंस्थेचे व्यवस्थापक उमेश जाधव युनिटी मल्टीकॉन्स कंपानीचे व्यवस्थापक जुबेर काझी,जनसंपर्क अधिकारी विनायक अहंकारी,प्रदीप गायकवाड आदीजण उपस्थित होते.