धाराशिव (प्रतिनिधी)-  मंगळवारपासून शहरातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत बाद  फेरीत रंगतदार सामने प्रेक्षकांना अनुभवास मिळाले. यजमान लातूर विभागाच्या मुला व मुलींच्या दोन्ही संघाने अंतिम फेरीत धडक मारून आपले वर्चस्व सिद्ध केले.

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि धाराशिव जिल्हा व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने 19 वर्षे वयोगटातील मुला मुलींच्या राज्यस्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेतील मुलांच्या वयोगटात उपांत्य सामन्यात लातूर विभागाने पुणे विभागावर 3 - 0 ने तर छत्रपती संभाजी नगर विभागाने मुंबई विभागावर 3 - 2 ने विजय प्रस्थापित करत अंतिम सामन्यात धडक मारले आहे. अंतिम सामना यजमान लातूर विभाग विरुद्ध छत्रपती संभाजी नगर यांच्यात होणार आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात मुंबई विभागाने पुणे विभागावर दोन शून्याने मात करत विजय प्रस्थापित केला आहे.

मुलींच्या वयोगटातील उपांत्य सामन्यात यजमान लातूर विभागाच्या संघाने नाशिक विभागावर 3- 0 विजय मिळवला. तर मुंबई विभागाने कोल्हापूर विभागावर 3-1 विजय प्रस्तावित केला. मुलींचा अंतिम सामना लातूर विभाग विरुद्ध मुंबई विभागात रंगणार आहे. तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात कोल्हापूर विभागाने नाशिक विभागावर 2-0 विजय प्रस्तावित केला.

 
Top