भूम (प्रतिनिधी)- मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख पत्रकार नितीन जाधव यांनी भूम येथे उमेदवारी अर्ज भरला वंचितांना, गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, गरजवंत मराठ्यांना मुख्य प्रवाहात आणून न्याय देणार असल्याचे पत्रकारांशी बोलताना नितीन जाधव यांनी सांगितले.
243 परांडा विधानसभा मतदार संघातून दि 29 ऑक्टोबर 2024 ठीक 1.00 वाजता तहसील कार्यालय भूम येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उमेदवार (अपक्ष) म्हणून पत्रकार संघाचे मंत्रालय मुख्य संपर्कप्रमुख नितीन जाधव यांनी साध्या पद्धतीने अर्ज भरला. जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार पदयात्रा, रॅली, न काढता फॉर्म भरला. यावेळी भूम परांडा वाशी तालुक्यातील मराठा बांधव, सर्व जाती धर्माचे बांधव. शेतकरी, पत्रकार मित्र, तरुण, महिला भगिनी यांनी तहसील बाहेर फॉर्म भरण्यापूर्वी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. राजकीय सल्लगार, जनसंपर्क अधिकारी म्हणून मंत्रालयात काम करणारे जाधव हे मेहनती व अभ्यासू असल्यामुळे न्याय देतील असा विश्वास मतदारसंघतील जनतेला वाटतो आहे. त्यांनी पत्रकारासोबत बोलताना सांगितले. जर मला संधी मिळाली तर माझ्या अनुभवाचा, सामाजिक कामाचा उत्तम प्रकारे उपयोग करून मतदारांना, जनतेला, शेतकऱ्यांना, गरजवंत वंचित समाजाला न्याय देणार तसेच काही ठराविक राजकीय मंडळीची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार. यावेळेस मतदार भूलथापांना बळी पडणार नाहीत. गोरगरीब, सामान्य कुटुंबातील अभ्यासू, आपल्यात राहणारा, आपल्यासारखा विचार करणारा व खरंच सर्वांना प्रगतीच्या प्रवाहात आणणाऱ्या उच्चशिक्षित सामान्य उमेदवाराला जनता पाठिंबा दिल्याशिवाय राहणार नाहीत. राजकारण हे फक्त धन दांडग्यांचे व श्रीमंतांचे झाले आहे व त्यात घराणेशाही सर्व दूर पसरली आहे. सदरच्या सर्व गोष्टींना चाप बसावा सर्व जातीपंथांच्या बहुजनांच्या अठरापगड जातीच्या व्यक्तीचे प्रश्न सुटावेत त्यांची कामे व्हावी, न्याय मिळावा यासाठी जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन विजयी करावे. भूम-परांडा-वाशी येथील जनतेने आशीर्वाद द्यावेत आपली सेवा करण्याची संधी द्यावी.