धाराशिव (प्रतिनिधी)- आमदार कैलास पाटील यांच्या प्रचारात त्यांच्या पत्नी शुभांगी पाटील यांनी प्रचारास सुरूवात केली आहे. मंगळवारी कळंब तालुक्यातील आठ ते दहा गावात डोअर टू डोअर प्रचार करत महिला तसेच नागरिकांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसापासून त्यांनी प्रचार सुरु केला असून खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पत्नी संयोजिनी राजे देखील त्यांच्या सोबत प्रचारात दिसत आहेत. महिलामध्येही त्यांचं स्वागत होत असून सध्या मतदार संघात त्यांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. लोकसभेलाही या दोघीनी प्रचारात मोठी भूमिका बजावली होती. घरोघरी गेल्याने त्यांच्याशी महिला देखील आपुलकीने संवाद साधत आहेत. सध्या लाडकी बहिणीच्या योजनेमूळ सत्ताधारी मंडळी महिलांच्या मताची बेरीज करताना दिसतात पण पाटील यांनी शासन आपली कशी फसवणूक करत आहे. याचे उदाहरणं देऊन सांगताना दिसतात त्यावरही महिला प्रतिसाद देत महागाई किती वाढली व योजनेनंतर त्यामध्ये अजून कशी वाढ झाली हे बोलत असल्याच श्रीमती पाटील सांगतात. गावोगावी केलेल्या विकास कामाच्या जोरावर जनतेला मत मागत असल्याच त्या सांगतात.