धाराशिव (प्रतिनिधी)- दि. 1 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर 2024 दरम्यान मुली आणि महिलांसाठी दोन महिने मोफत कराटे प्रशिक्षण शिबिराचे आयोजन युवराज नळे यांनी केले होते. अगदी सुरुवातीपासूनच याला उत्तम प्रतिसाद मिळाला. शेकडो मुली व महिलांनी या शिबिरात स्वसंरक्षणाचे धडे गिरवले आणि आत्मविश्वासाने सज्ज झाल्या. 

या दोन महिन्यांच्या प्रशिक्षणादरम्यान भरोसा सेलच्या प्रमुख पोलिस उपनिरीक्षक अनघा गोडगे यांनी निर्भय बनण्याबाबत आवाहन केले. तसेच डॉ प्रियंका चौरे यांनी मुलींना व महिलांना आरोग्य आणि आहार बद्दल मार्गदर्शन केले. तर ॲड वैशाली देशमुख, ॲड जयश्री तेरकर यांनी हक्क आणि कायदेशीर अधिकारांची जाणीव करून दिली. निर्भय बनो शिबिराच्या समारोप प्रसंगी डॉ अभय शहापूरकर आणि माया पानसे यांनी सकस व निर्भय समाज निर्मितीसाठी अशा प्रशिक्षण शिबीराची नितांत आवश्यकता असून या प्रशिक्षणाची उपयुक्तता निश्चितच पुढील काळात कामाला येईल असा विश्वास व्यक्त केला व त्यांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र व 'तिच्या कविता ' हा काव्यसंग्रह  देऊन समारोप करण्यात आला. यावेळी प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. संयोजक युवराज नळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे सर्व मान्यवर, प्रशिक्षक आणि पालकांचे आभार व्यक्त करून निर्भयपणे ताठ मानेने जगण्याचे सर्व प्रशिक्षणार्थींना आवाहन केले. या प्रशिक्षणामुळे आमच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला असून मनातील भीती दूर झाल्याची भावना अनेकिंनी व्यक्त केली. याप्रसंगी प्रविण गडदे, मनोज पतंगे, वैष्णवी सरडे, बुशरा तांबोळी या प्रशिक्षकांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी वर्षा नळे, ॲड जयश्री तेरकर, वैभव वाघचौरे, विक्रांत नळे, योगिनी साळुंखे, ऋतुजा खरे यांनी विशेष परिश्रम घेतले.

 
Top