धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील कनिष्ठ विभागाचा मुलीचा संघ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड येथे थ्रो बॉल विभागीय स्पर्धेसाठी पाठवण्यात आला होता. या संघाने  विभागीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या संघाची पुढील कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी 19 वर्षीय वयोगटातील कनिष्ठ विभागातील सर्व खेळाडू मुलींचे व मार्गदर्शक दत्तात्रय जावळे यांचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

यशस्वी खेळाडूंना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख, जिमखाना विभागातील श्री दत्तात्रय जावळे,जिमखाना विभागातील सर्व सदस्य यांचे मार्गदर्शन लाभले.

 
Top