धाराशिव (प्रतिनिधी)- समर्थ मंगल कार्यालय येथे रोटरी क्लब व ओस्ला ओॲसीस लेडीज यांच्यातर्फे, माऊली कन्स्ट्रक्शन प्रायोजित फक्त महिलांसाठी दांडिया नाईटचे आयोजन करण्यात आले होते. ह्या दोन्ही दिवसांमध्ये महिलांनी दांडिया नाईटचा पुरेपूर आनंद लुटला. तेथे अनेक खाद्यपदार्थांचे व इतर वस्तूंचे स्टॉलही लावण्यात आले होते. त्याचाही महिलांनी आस्वाद घेतला.
रोटरी क्लबच्या वतीने प्लॅस्टिकचा अतिवापर टाळण्यासाठी बॅनर लावण्यात आले. तसेच साड्यांपासून शिवलेल्या कापडी पिशव्या वीस रुपयांत उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये पहिल्या दिवशी रूपाली कोठारी यांना प्रथम दांडिया क्वीनचा मुकुट मिळाला. तसेच ममता पांगळ या दांडिया क्वीनच्या द्वितीय विजेत्या ठरल्या. ग्रुप दांडियामध्ये माहेश्वरी ग्रुप प्रथम व ओजस्विनी ग्रुपचा द्वितीय क्रमांक आला. तसेच बेस्ट कॉस्च्युम, बेस्ट स्टॅमिना. बेस्ट परफॉर्मन्स अशी विविध बक्षिसे देण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा तारखेला रिया राठोड या प्रथम दांडिया क्वीनच्या मानकरी ठरल्या. तर दिव्या निंबाळकर यांना द्वितीय क्रमांकाचे दांडिया क्वीनचे पारितोषिक मिळाले. यावेळी एडीए क्वीन्स ग्रुपला प्रथम क्रमांकाचे ग्रुपचे बक्षीस तर नवदुर्गा ग्रुपला द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. श्रीराम जिंतूरकर, सचिव आनंद कुलकर्णी तसेच ओस्ला ओॲसीस लेडीजच्या डॉ. अनार साळुंके, किरण देशमाने, शशांकी संगवे व सुप्रिया दुधभाते यांचे सहकार्य लाभले.