धाराशिव (प्रतिनिधी)-राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित पवार सयांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यतत्पर जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते आणि मराठवाडा शिक्षक आमदार विक्रम काळे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिराजदार, प्रदेश सरचिटणीस सुरेश पाटील, अल्पसंख्यक जिल्हाध्यक्ष असद खान पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा कार्यालय धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महिला पदाधिकारी यांची नियुक्तीपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
अल्पसंख्याक महिला जिल्हा कार्याध्यक्षपदी अमिना रियाज शेख तसेच अल्पसंख्याक महिला जिल्हा उपाध्यक्षपदी आसमा एजाज सय्यद, अल्पसंख्याक महिला जिल्हा सचिवपदी निलोफर सरफराज सय्यद, अल्पसंख्याक महिला जिल्हा सहसचिव पदी सना फरीद शेख, शबाना बेग अल्पसंख्याक महिला शहराध्यक्ष यांची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.
यावेळी नवनियुक्त पदाधिकारी यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांचे जिल्ह्यातील नेतृत्वावर विश्वास ठेवीत आज पदभार स्वीकारत असून या पुढील काळात पक्ष वाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करू व दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडू.
यावेळी जिल्हाकार्याध्यक्ष समीयोद्दीन मशायक,ॲड.प्रवीण यादव, तुळजापूर विधानसभा अध्यक्ष मलंग शेख,भूम परंडा वाशी विधानसभा अध्यक्ष नवनाथ आप्पा जगताप,धाराशिव कळम विधानसभा अध्यक्ष मोहन मुंडे, धाराशिव तालुकाध्यक्ष प्रशांत फंड, तुळजापूर तालुकाध्यक्ष श्रीकृष्ण सूर्यवंशी,परंडा तालुकाध्यक्ष अमोल काळे, कळम तालुका अध्यक्ष शिवाजीराव लकडे,भूम तालुकाध्यक्ष ॲड.रामराजे साळुंखे,वाशी ता.अध्यक्ष सूर्यकांत सांडसे,नंदकुमार गवारे,धाराशिव शहराध्यक्ष सचिन तावडे,तुळजापूर शहराध्यक्ष महेश चोपदार,बेंबळी शहराध्यक्ष अतिष मर्गणे,नळदुर्ग शहराध्यक्ष अजित अण्णा जुनैदी,सामाजिक न्याय प्रदेश सरचिटणीस सचिन सरवदे, सामाजिक न्याय मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष विवेकानंद साळवे,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, महिला जिल्हाध्यक्षा सरला खोसे,सेवादल सेल जिल्हाध्यक्ष सतीश घोडेराव,ओबीसी जिल्हाध्यक्ष स्वामी बाळासाहेब, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष सलीम हन्नुरे तसेच जिल्हातील सर्व प्रमुख पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी, सर्व प्रदेश पदाधिकारी,सर्व तालुकाध्यक्ष व पदाधिकारी, सर्व शहराध्यक्ष व पदाधिकारी, सर्व फ्रंटल सेल जिल्हाध्यक्ष व पदाधिकारी, कार्यकर्ते व सहकारी मोठया संख्येने उपस्थित होते.