धाराशिव (प्रतिनिधी)- विद्यानगर बावी येथील वसंत प्राथमिक जवाहर माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी शालेय पावसाळी क्रीडा स्पर्धेत वैयक्तिक व सांघिक स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. कबड्डी या स्पर्धेत आश्रम शाळेचे 14, 17, 19 वयोगट मुलांचे संघ तालुक्यात प्रथम आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊन 14 वयोगट मुलांचा व 19 वयोगट मुलांचा संघ जिल्ह्यात प्रथम आले. जिल्ह्याचा नेतृत्व करताना 14 वयोगट लातूर विभागातून प्रथम आला. तर 19 वयोगटाचा संघ तृतीय आले. 14 वयोगट कबड्डीचा संघ दिनांक 13 ऑक्टोबर रोजी बालेवाडी पुणे येथे राज्यस्तरीय स्पर्धा खेळणार आहे. त्याचबरोबर शालेय रब्बी 19 वर्षे मुलांचा संघ जिल्ह्यात द्वितीय आला तर शालेय बेसबॉल 19 वयोगट मुलींचा दुसरा 17,वयोगट मुलींचा तिसरा आला तसेच 19 वयोगट मुलींचा सॉफ्टबॉल मध्ये तृतीय आला.त्याचबरोबर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव व शिक्षण विभाग आयोजित कला महोत्सवांमध्ये शाळेने बंजारा समुहनृत्य सादर करून जिल्ह्यामध्ये द्वितीय आला.

सर्व विजयी खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन शिक्षण विभाग बीट बावीचे शिक्षण विस्तार अधिकारी चिलवंते सी.एन., केंद्रीय मुख्याध्यापक बावीचे शीर्षीकर, आश्रम शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य दयानंद मनोहर राठोड, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी जगताप बी.यु. यांनी विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक प्रा.राठोड व्ही.टी., जगताप औदुंबर, जाधव एन.बी. यांचा शालेय प्रांगणात पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार केला व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.


 
Top