परंडा (प्रतिनिधी) - भूम - परंडा - वाशी मतदार संघाचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचे दि. 2 अक्टोंबर रोजी संध्याकाळी पुणे येथे उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले होते. या निमित्त आज शनिवार दि.5 रोजी परंडा येथील फोटोग्राफर असोसिएशनच्या वतीने कै. ज्ञानेश्वर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी परंडा तालुका फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष लखन भोजने, अमर यादव, भीमराज सरवदे, बिजू शिंदे, सुहास जाधव, योगेश बनसोडे, संदीप सुतार, नितीन कोळी,राहुल मुंगळीकर सह आदी सदस्य उपस्थित होते.

 
Top