तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील रोटरी क्लब ऑफ तुळजापूरच्या वतीने 2024-25 देण्यात येणारा राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार शहरातील विविध शाळेतील ऐकोणीस शिक्षकांना  रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रशांत अपराध, सचिव संतोष लोखंडे यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.

पुरस्कार प्राप्त शिक्षकात सैनिक विधालायाचे प्राचार्य वैजीनाथ घोडके, श्रृतिका रम्या, निर्मला कुलकर्णी,  वैभव कुलकर्णी, शिवाजी साखरे, जयराज सूर्यवंशी,  राजेंद्र जोगदंड, शशिकांत सवने, शिवशंकर जळकोटे, सारा काळे, शिला टाक, निर्मला जाधव, संगीता पठाडे, दगडू कुंभार, शिवाजी कारंडे, प्रभाकर मुळे, शांताबाई आंबूसे, गणेश रोचकरी, अश्विनी कोंडो यांचा यांचा समावेश आहे. 

यावेळी विष्णुदास अंबर, अनिल रोचकरी, भरत जाधव, संजय जाधव, रामचंद्र गिड्डे, अमोल गुंड, स्वाती नळेगावकर, रूपाली गुंड, सुरेश कदम, सुधीर शेळके सह नागरिक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.

 
Top