भूम (प्रतिनिधी)- येथील जनविश्वास को - ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या वतीने दिपावली निमित्त 350 गरजू कुटुंबाची दिपावली गोड करण्यात आली.
यावेळी बँकेचे चेरअमन बोलत असताना म्हणाले की, अन्नदान हे गुपित ठेवावे असे सांगणे पहिल्यापासून आमच्या कुटुंबाला माझा बाबांनी वेळी वेळी सांगितले आहे. यामुळेच या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असूनही आजवर आम्ही कधी या उपक्रमाला जास्त प्रसिद्धी दिली नाही. परंतु आजच्या या सोशल मीडिया युगात आपण पाहत आहोत. रोज नवीन नवीन लाईफ स्टाईल युवकांच्या मनात रुजत चालल्या आहेत. याला सर्वात जास्त आजचे युवक सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करून चुकीच्या विविध प्रकारच्या व्यवसनाच्या जाळ्यात अडकत आहेत. यामुळे मी यावर्षी या उपक्रमाला अधिक प्रसिद्धी देत आहे. कारण यालाही आजकालच्या युवकांनी फॉलो करून याचे व्यसन लाऊन घावे व जास्तीत जास्त समाज सेवा करावी. खऱ्या अर्थाने या व्यसंनाची गरज आजच्या युवा पिढीला आहे. हे व्यसन युवकांनी केल्यास त्यांच्या आई बाबां नाही मोटा आनंद होईल. आपल्या जनविश्वास बँकेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी हा उपक्रम वाढवला जाईल व सामाजिक यासह व्यापारी वर्गाला विविध कर्ज योजना सुलभ व कमी व्याज दराने देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. असे यावेळी संतोष वीर म्हणाले. यावेळी अरुण शाळू महाराज, अरुण वीर, महेश वीर, लाईक अली पठाण, रवी लोंढे यांच्या सह बँकेचे कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोमनाथ गुंजाळ यांनी केले. तर उपस्थित मान्यवरांचे आभार महेश वीर यांनी मानले.