तुळजापूर (प्रतिनिधी) - मेरा युवा भारताच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दि. 30 ऑक्टोबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर युवक, युवतीनी आपला देश, राज्य, जिल्हा, तालुका, गाव स्वच्छ ठेवण्याची शपथ घेवुन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते भवानी रोडवर स्वछता अभियान राबवले.
जिल्हा युवा अधिकारी धनंजय काळे यांच्या मार्गदर्शनाखाली नेहरू युवा माय भारत केंद्राच्या व टाटा सामाजिक विज्ञान संस्था तुळजापूर, नवनिर्मिती व प्रेरणा बहुउद्देशीय महिला मंडळ सामाजिक संस्था तुळजापूर तसेच रोटरी क्लब तुळजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्व विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. आपला परिसर, आपले गा, आपला तालुका, आपला जिल्हा, आपले राज्य, आपला देश स्वच्छ ठेवण्याची शपथ घेत कार्यक्रमास सुरूवात केली. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तुळजाभवानी माता मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावे माय भारत धाराशिव कार्यालय येथील कर्मचारी वैभव लांडगे, वाघमारे, नवनिर्मिती संस्थेच्या अध्यक्षा मीना सोमाजी, रोटरी क्लब तुळजापूर तालुका अध्यक्ष प्रशांत अपराध, टाटा संस्थेचे कर्मचारी व विद्यार्थी हरिप्रसाद सोमाजी, कदम दर्शन, संजय खुरूद यांच्या परीश्रमाने कार्यक्रम संपन्न झाला.