तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूर विधानसभा मतदार संघ महाविकास आघडीत काँग्रेस कडे राहील असे प्रररतिपादन सहप्रभारीराष्ट्रीय सहसचिव कुणाल चौधरी यांनी तुळजापूर येथे रविवार दि 6 रोजी मनीषा मंगल कार्यालयात काँग्रेस पक्षाचा बीएलए बूथप्रमुख यांचा मेळावात केले. यावेळी माजी आमदार, अल्पसंख्यांक सेलचे माजी प्रदेशाध्यक्ष एम.एम. शेख व जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी चौधरी यांनी बुथ प्रमुखांना संबोधित करताना म्हणाले की, संविधान रक्षणासाठी, दीन दलित कष्टकरी शेतकरी मजूर युवक अल्पसंख्यांक यांच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या सामान्य माणसाचा आवाज बनलेल्या राहुल गांधी यांची जीभ कापून आणा म्हणणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा तीव्र शब्दात निषेध केला. जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार राणा पाटील यांचे डिपॉझिट जप्त करण्यासाठी महाविकास आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी प्रत्येक कार्यकर्त्याने खंबीरपणे उभे राहावे असे आव्हान केले. आजच्या या बूथप्रमुखाच्या मेळाव्यामधून तुळजापूर विधानसभेचा उमेदवार घोषित करीत आहोत. हाताचा पंजा हा तुळजापूर विधानसभेचा उमेदवार असून महायुतीच्या आमदारांना महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी तुळजापूर विधानसभेमध्ये हाताचा पंजा या उमेदवाराला असंख्य मताने विजयी करा असे आव्हान केले.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड.धीरज पाटील यांनी सर्व प्रथम धाराशिव मधील सर्व चार विधानसभा बीएलए व बूथ कमिटी यांच्या अहवालाचे वाचन केले. आपले विचार व्यक्त करताना काल भाजपा आमदार यांना जाब विचारण्यासाठी गेलो असता अतिशय अवमानकर भाषा वापरत जो अपमान केला त्याचा निषेध केला. जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने जाहीर निषेधाचा ठराव संमत करण्यात आला. तुळजापूर विधानसभेत महाविकास आघाडीचा पक्ष देईल तो उमेदवार निवडून द्यावे असे आवाहन केले. महायुती सरकारने ज्या घोषणाचा सपाटा लावला यावर सडकून टीका केली. या तालुक्यात कोण हुकूमशाही करणार असेल तर त्यास जनता कधीच माफ करणार नाही. त्यामुळे मी तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत पोहचून त्यांची सेवा करेन एवढाच विश्वास त्यांनी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी ॲड धीरज पाटील, सयाजीराव देशमुख, सय्यद खलील, ज्योतीताई सपाटे, डॉक्टर स्मिताताई शहापूरकर, ढवळेताई, अनिल लबडे,जनसेवक अमोल कुतवळ, तालुकाध्यक्ष रामदादा आलूरे, धाराशिव तालुका अध्यक्ष विनोद वीर, राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, आयुब पठाण, पांडुरंग कुंभार, सत्तार भाई शेख, महेश देशमुख, माजी नगरसेवक नागनाथ भांजी, श्रीकांत धुमाळ, अग्निवेश शिंदे, रामराव पाटील, बालाजी बंडगर, हरीश राठोड, सुधीर गव्हाणे, भारत चव्हाण, बापू हरकर, काका सोनटक्के, बापू खटके, सलमान चौरे, राजाभाऊ मोरे, अतुल वानेवाडी, प्रदेश सरचिटणीस महेश देशमुख व युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आश्लेष मोरे आदी काँग्रेसचे पदाधिकारी व तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुबेर शेख यांनी केले.