धाराशिव (प्रतिनिधी)-अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची महाराष्ट्र शाखा, अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षपदी धाराशिव जिल्ह्यातून निवड झाल्याबद्दल लालासाहेब मगर, लातूर जिल्ह्य़ातून राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल परमेश्वर बालकुंदे. तसेच मराठवाडा विभाग अध्यक्षपदावर निवड झाल्याबद्दल लातूरचे जिल्हाध्यक्ष सुनीलकुमार हाके यांचा सत्कार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या धाराशिव शाखेच्या वतीने रविवार दि. 20 ऑक्टोबर रोजी शाहू शिक्षक सोसायटी मध्ये करण्यात आला.
बशीर तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सत्कार कार्यक्रमासाठी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या महिला कार्यकारणी सदस्य सविताताई पांढरे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे, जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे, नगरपरिषद विभाग जिल्हाप्रमुख राजेंद्र पवार, शाहू शिक्षक सोसायटीचे चेअरमन सुरेश भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होत.
या वेळी लालासाहेब मगर, परमेश्वर बालकुंदे, सुनील हाके, बशीर तांबोळी यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास संतोष डोके, राजाभाऊ गिरी, जगदीश जाकते, प्रदीप तांबे, बाळासाहेब कांबळे, राजाभाऊ आकोसकर, लक्ष्मण घोडके, संजय गाडेकर, मिलिंद जानराव, शाहू सोसायटीचे माजी चेअरमन मिलिंद धावारे, श्रीहरी बिडवे, प्रवीण गाडे, सुधीर गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मालोजी वाघमारे, मारोती काळे, बोडके सर, धाराशिव तालुकाध्यक्ष नागनाथ मुडबे, लोहारा तालुकाध्यक्ष सुधीर घोडके, धाराशिव तालुका सरचिटणीस बालाजी निंबाळकर, शिवाजी साखरे, धम्मदीप सवाई, जीवन पाटील, शिवलिंग हंकारे, चंद्रसेन आल्टे,भास्कर मस्के, गौतम रणदिवे,पंकज मोरे, प्रभाकर लांडगे, रजनीकांत तुपारे, ज्ञानेश्वर आदटराव, शेखू जेटीथोर, प्रेमनाथ जाधव, आण्णासाहेब इताले, नंदकुमार तोडकरी, दिनकर रसाळ, विमल मक्तेदार, क्षिरसागर सर, सुधाकर मस्के यांच्यासह बहुसंख्य जण उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे यांनी केले. तर आभार जिल्हा सरचिटणीस अविनाश मोकाशे यांनी मानले.