धाराशिव (प्रतिनिधी)- गेल्या आठवड्यात रस्त्यातील खड्ड्यामुळे ओंकार जाधवर या युवकांचा मृत्यू झाला होतो. त्या निषेधार्थ धाराशिव शहरातील नागरिकांनी सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत शहर बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर काळ्या फिती लावून मुक मोर्चा काढला होता.

 जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात शहरातील रस्ते व वीज व्यवस्थेच्या दुरावस्थेच्याबाबत पत्रकार व नागरिकांनी बऱ्याचदा आवाज उठवला. परंतु प्रशासनाने गांभिर्याने न घेतल्यामुळे ओंकार जाधवर या तरूण व्यापाऱ्याचा रस्त्यावरील खड्ड्यामुळे मृत्यू झाला. याबद्दल संबंधित यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. शहरातील जेष्ठ नागरिक यांना बाहेर फिरणे कठीण झाले आहे. वाढती अतिक्रमणे, विस्कळीत वाहतूक व्यवस्था, रस्त्याची दुरावस्था, चोऱ्यांचे व लुटमारीचे प्रकार याबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील रस्ते त्वरीत दुरूस्त करावेत, वाढती अमिक्रमणे काढून वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, चोऱ्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना करावी या प्रमाणे 7 मागण्यांना करण्यात आल्या आहेत. या मुक मोर्चामध्ये धाराशिव जिल्हा व्यापारी महासंघ, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स, जिल्हा सराफ व सुवर्णकार असो, जिल्हा केमिस्ट व ड्रगिस्ट असो, जिल्हा विधिन्य मंडळ, जिल्हा पत्रकार संघ, जिल्हा मराठी पत्रकार संघ , वॉइस ऑफ मीडिया धाराशिव, जिल्हा मोटार मालक असो, इंडियन मेडिकल असो यांच्यासह अनेक संघटनांनी सहभाग नोंदविला.

 
Top