तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर-लातूर महामार्ग रस्त्यावर असणाऱ्या काक्रंबा गावानजीकच्या अर्धवट काम झालेल्या उड्डान पुलाजवळ मंगळवार दि. 29 ऑक्टोबर रोजी राञी साडेदहा वाजता विविध वाहनांच्या विचित्र झालेल्या अपघातात दोन जण ठार तर आठ जण जखमी झाल्याची घटना घडली.
या बाबतीत अधिक माहीती अशी कि, काक्रंबा अर्धवट पुलाजवळ निलंगा येथील टाटा सुमो गाडी एम. एच. 14 सी. एक्स. 3449 ही गाडी पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असताना काक्रंबा येथील उड्डाणपूला जवळ आली. याला वाहन धडकले. या सुमोतील जखमींना उपचारासाठी पाठवत असताना 1033 हायवे वरील मदत वाहन या ठिकाणी मदत करत होते. दरम्यान लातूरहून स्विफ्ट कार एम. एच. 12 जी. व्ही. 7041 या कारने मदत वाहनासह सुमोला जोरात धडक दिल्याने स्विफ्ट कार मधील महेश श्रीहरी चव्हाण व बापू सूर्यवंशी या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तसेच यात महादेव सुदाम रोडेवार, गिरीधर शेषेराव पारेकर, शंकर सुरेश पारेकर, गणेश विश्वनाथ तोंगरे, हेमा मनोज धने, द्वारका ज्ञानेश्वर पल्ले, गजानन महादेव पारेकर, पार्वती महादेव रोडेवार, केदारपुर धिरज सोनवणे हे जखमी झाले. यांची गंभीर प्रकृती पाहता सोलापूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे.