धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक स्कूल, धाराशिवची विद्यार्थीनी कु.संस्कृती नानासाहेब बोराडे इ. सहावी हीने लातूर येथे दि. ६.१०.२४ रोजी झालेल्या विभागीय शालेय रोलर स्केटिंग स्पर्धा २०२४ २०२५ मध्ये तिसरा क्रमांक प्राप्त करून पुढे राज्यस्तरीय स्पर्धेकरिता तिची निवड झाली आहे .तिला धाराशिव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन, धाराशिव चे सचिव व कोच प्रविण गडदे ,दुसरे कोच यशोदिप कदम आणि कैलास लांडगे यांचे मार्गदर्शन लाभले.यानिमित्त तेरणा पब्लिक स्कूल, धाराशिव चे प्राचार्य मोरे ,उपप्राचार्य बचाटे ,कापसे व राठोड यांनी अभिनंदन केले आहे.