भूम (प्रतिनिधी)- मतदारसंघाला तिसरी आघाडी सक्षम पर्याय असून लवकरच महापरिवर्तन महाशक्ती आघाडीकडून निवडणूक लढवणार असल्याचे सूतोवाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गोरख भोरे यांनी ओयाजित केलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

ते पुढे म्हणाले की, परंडा विधानसभा मतदारसंघ हा विकासापासून कोसो दूर आहे. पूर्वीही या मतदारसंघाची मागास अशी ओळख होती आणि आजही ती ओळख कायम आहे. शेतकऱ्यांचे दुधाचे तसेच धान्याचे दराचे दराच्या समस्या आज ही कायम आहेत. याकडे आजी आणि माजी आमदार गांभीर्याने घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे तिसऱ्या आघाडीतून निवड समितीने संधी दिल्यास आगामी विधानसभा लढवण्यास असल्याचे स्वाभिमान शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गोरख भोरे यांनी सांगितले.ते रविवार दिनांक 6 रोजी भूम शासकीय विश्राम गृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले की, भूम तालुक्यामध्ये दुधाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात होते. मात्र आजी आणि माजी आमदारांनी दुधाच्या दरासंदर्भात काहीही केलेले नाही. या भागात सोयाबीनचे विक्रमी उत्पादन होते. मात्र सोयाबीनचे दर वरचेवर कमी होत आहेत. आजवरच्या राजकारण्यांनी परंडा विधानसभा मतदारसंघातील सर्व सहकारी संस्था मोडकळीस आणल्या. राज्यामध्ये दूध लढविणार असल्याचे स्वाभिमानी संकलनात आपला दबदबा निर्माण केलेला भूम तालुका सहकारी दूध संघ भंगारात काढला आहे. एमआयडीसीमध्ये मोठे उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे परंडा विधानसभा मतदारसंघातील युवक हा देशोधडीला लागलेला आहे. परंडा विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून मी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे. आगामी काळात राज्यासह परंडा विधानसभा मतदारसंघात तिसरी आघाडी हाच पर्याय ठरू शकतो, असेही गोरख भोरे यांनी सांगितले. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, अमृत भोरे यांच्यासह पदाधिकारी हजर होते.

 
Top