तुळजापूर (प्रतिनिधी)- शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या तुळजाभवानी महाविद्यालयाचे शैक्षणिक योगदान मोलाचे असे प्रतिपादन आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले. येथील तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे ते बोलताना आमदार पाटील म्हणाले की, तुळजापूर हे आई तुळजाभवानीच्या नावाने ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहे अगदी त्याचप्रमाणे तुळजापूर हे शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा प्रगत झाले पाहिजे भारताच्या नकाशात तुळजापूर हे शैक्षणिक दृष्ट्या प्रगत झालेले दिसून आले पाहिजे भविष्यामध्ये तुळजापूर शहरांमध्ये केंद्रीय विद्यापीठाची स्थापना होणार आहे या विद्यापीठात तरुणांना विविध कौशल्यावर आधारित कोर्सेस उपलब्ध होणार आहेत ज्या माध्यमातून तरुणांना वेगवेगळ्या प्रकारचे रोजगार उपलब्ध होतील जेणेकरून आपल्या भागातील तरुणांची बेरोजगारी संपुष्टात येईल भविष्यामध्ये आपल्याला अनेक सामाजिक दृष्ट्या प्रगतिचे अशी कामे करायची आहेत ज्या कार्याच्या माध्यमातून समाजाचे हीत साधले जाईल.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार बोलताना यावेळी म्हणाले की तुळजापूर मध्ये एक प्रकारची शैक्षणिक क्रांती घडून येऊ शकते कारण जिथे श्रद्धा असते तिथे ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार हे शिक्षणाच्या माध्यमातूनच प्राप्त होऊ शकतात यासाठीच तुळजाभवानी महाविद्यालय हे आम्ही तुळजापूरकर शिक्षणासाठी एक पाऊल पुढे ही संकल्पना घेऊन तुळजापूर मध्ये शैक्षणिक दृष्ट्या कार्य करणार आहे या कार्यासाठी तुळजापूर वासियांनी सुद्धा आपल्या परीने सहकार्य करावे ही अपेक्षा आहे. सदर प्रसंगी सचिन रोचकरी,आनंद कंदले यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक धनंजय लोंढे यांचे विशेष सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक कोरे यांनी केले तसेच यावेळी प्राचार्य दौंड, मुख्याध्यापक येलगुंडे यांची देखील विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रा. राजा जगताप यांनी मांडले.