धाराशिव (प्रतिनिधी) - रुपामाता उद्योग समूहाच्या अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील मुर्टा येथील दिग्विजय एंटरप्राइजेस गुळ कारखान्याच्या 2024 चे रोलर पूजन व ऊस उत्पादकांच्या मेळाव्याचे आयोजन रविवार दि.6 ऑक्टोबर रोजी करण्यात आले आहे.
शेतकरी मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. मात्र उत्पादन म्हणजे उतारा कमी होत असल्यामुळे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे एकरी 100 टन ऊस उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी नेमके कोणते तंत्र अवगत करावे ? या विषयी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे, धाराशिव बार कौन्सिल असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. रविंद्र कदम व प्रगतिशील शेतकरी सत्यवान सुरवसे हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रूपामाता उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष ॲड व्यंकटराव गुंड पाडोळीकर हे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास नळदुर्गसह तुळजापूर परिसरातील ऊस उत्पादक व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲड गुंड व गुळ कारखान्याचे चेअरमन विक्रम सुरवसे यांनी केले आहे.