धाराशिव (प्रतिनिधी)-  दीपावलीच्या पाश्वभूमीवर मुलांच्या कल्पकतेला व सृजनशीलतेला वाव मिळावे. या हेतूने प्रशालेमध्ये कार्यानुभव विषयांतर्गत कौशल्य विकास कार्यानुभव शिक्षिका परतापुरे पी.डी  यांनी सर्व विद्यार्थ्यांना आकाश कंदील कसे बनवावे याचे मार्गदर्शन करून स्पर्धा घेण्यात आली.

या स्पर्धेमधे तब्बल 251 विद्यार्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व सर्व विद्यार्थांनी  एका पेक्षा एक सुंदर आकाश कंदील बनवले. या स्पर्धा संपन्न होत असताना विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष तथा प्रशालेचे माजी प्राचार्य डॉ. व्ही. बी. पडवळ, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे, उपमुख्याध्यापक प्रमोद कदम, पाचवी विभागाचे पर्यवेक्षक धनंजय देशमुख या  सर्व पदाधिकाऱ्यांनी  पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व पाचवी विभागातील सर्व शिक्षक, शिक्षिका यांचे कौतुक केले.

हा कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी कार्यानुभव शिक्षिका पी.डी. परतापुरे तसेच सुरज सपाटे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. तसेच हा कार्यक्रम पार पडण्यासाठी इयत्ता पाचवीच्या सर्व कर्मचारी बंधू भगिनींनी मोलाचे सहकार्य केले. सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम उत्साही वातावरणात संपन्न झाला.

 
Top