धाराशिव (प्रतिनिधी)-  विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 70 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान येत्या 20 नोव्हेंबर रोजी व्हावे यासाठी जिल्ह्यात व्यापक प्रमाणात मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

आज 30 ऑक्टोबर मतदान जनजागृती कार्यक्रमाचा एक भाग म्हणून धारशिव येथे सायकल रॅली आयोजित करण्यात आली. सकाळी 8 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथून सायकल रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.या रॅलीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन,जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील,शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंके,जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी पुरुषोत्तम रुकमे,गट शिक्षणाधिकारी असरार सय्यद,विस्तार अधिकारी श्री. देवगुडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.शिक्षक श्री.पाटील यांचा बोलका बाहुला सुद्धा रॅलीत सहभागी होता. बोलक्या बहुल्याने सुद्धा मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले.

ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय,सेंट्रल बिल्डिंग चौक,बार्शी नाका,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अण्णाभाऊ साठे चौक या मार्गाने परत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचली.या रॅलीमध्ये छत्रपती शिवाजी हायस्कूल,पोतदार इंटरनॅशनल स्कूल यासह अन्य शाळांचे विद्यार्थी,शिक्षक व विविध विभागाचे कर्मचारी सहभागी होते. विद्यार्थ्यांनी रॅलीतून मतदान जागृती करणाऱ्या घोषणा दिल्या तसेच जनजागृती करणारे पोस्टर्स सायकलवर दर्शनी भागात लावण्यात आले होते.

 
Top