कळंब (प्रतिनिधी)- भारतीय संस्कृती पुरातन आहे यामध्ये गो पूजेला विशेष स्थान आहे. दिपवाली सणाची सुरुवात वसुबारस या दिवसापासून होते यानिमित्त महिला दिवसभर उपवास करतात व सायंकाळी गाय वासराची पूजा करून, त्यांना घास देऊन जेवण करतात. यानिमित्त ठिकठिकाणी गाय वासराची पूजा केली जाते.
कळंब तालुक्यातील तांदळवाडी शिवार परिसरात समर्थ गोशाळा येथे दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी वसुबारस निमित्त गाय व वासराची पूजा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कळंब पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवी सानप, ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुरेश टेकाळे, मुख्याध्यापक राजेंद्र बिक्कड, स्थानिक गुन्हा शाखेचे मोटे गावकर, माधवसिंग राजपूत सामाजिक क्षेत्रातील डॉ. अनिल यादव, महेश जोशी, वनिता कटाळे, राजाभाऊ कोळपे, नाना शिंगणापुरे, दिलीपचंद लोढा, पोपट साळवे यांची उपस्थिती होती.
याप्रसंगी समर्थ गोशाळेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन समर्थ गोशाळेचे संचालक, संजय देवडा, गणेश सदाफुले यांनी सत्कार केला. याप्रसंगी गणेश सदाफुली यांनी या गो शाळेविषयी माहिती दिली. गो शाळेसाठी सात एकर जागा वापराची उपलब्ध झाली असून आज या ठिकाणी 110 गाय वासराचा सांभाळ केला जातो. तर याप्रसंगी पोलीस निरीक्षक रवी सानप, सुरेश टेकाळे, माधवसिंग राजपूत, राजेंद्र बिक्कड यांनी आपले विचार व्यक्त केले. आभार संजय देवडा यांनी मानले.