तुळजापूर (प्रतिनिधी)- प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी पापनास तिर्थ, विवेकांनद नगर भागातील रहिवाशींना कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती, विजय गंगणे मिञ परिवार वतीने हजारो महिलांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी साहित्य भाऊबीज भेट म्हणून स्काँयलँड हाँटेल मध्ये झालेल्या कार्यक्रमात विजय गंगणे यांच्या सौभाग्यवती प्रियंका गंगणे, पुजा विनोद गंगणे, रुद्र विजय गंगणे सह पञकारांचा हस्ते वितरीत करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रियंकाताई गंगणे म्हणाल्या की, स्वतःसाठी सगळेच जगतात. दुसऱ्यासाठी थोडे तरी जगा या उद्देशाने माझे पती विजय गंगणे यांच्या माध्यमातून गेली दहा वर्षा पासुन आम्ही हा उपक्रम घेत आहोत. यातुन आम्हाला प्रचंड आत्मिक समाधान मिळते. आम्ही दिवाळींला हिंदूना व ईद सणाला मुस्लिम बांधवांना ही ईद सण साजरा करण्यासाठी शिधावाटप करतो असे या वेळी म्हणाल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन विजय गंगणे यांच्या सहकार्याने केले होते. या उपक्रम यशस्वीतेसाठी मनोज गवळी, ओकार लोंढे,अक्षय माने, वाजिद तांबोळी, सुशांत हत्तीकर, अनिकेत दिवटे,मिलिंद शिरसाट, पंकज जमादार, श्रीकांत सिद्ध गणेश, अविनाश वैरागे, प्रहर्ष बरुरकर, सागर सुरवसे यांनी परिश्रम घेतले.