धाराशिव (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवादरम्यान मोबाईल चोरणारा चोरास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नवरात्र उत्सवादरम्यान चोरी, जबरी चोरी इत्यादी मालाविषयक गुन्ह्यांस आळा घालण्यासाठी व अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासाठी तुळजापूर मंदीर परिसर व शहरात गर्दीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना पथकास दि.09. 10.2024 रोजी  माहिती मिळाली की, तुळजाभवानी मंदीरासमोरील शहाजी महाद्वार समोर दत्तात्रय जर्नाधन म्हसे, वय 65 वर्षे, रा. आरडगाव ता. राहुरी जि. अहमदनगर यांचा अंदाजे 11 हजार रूपये किंमतीचा मोबाईल फोन चोरीस गेल्याने दत्तात्रय म्हसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुन्हा क्र.465/2024, भा.न्या.सं. कलम- 309(4) अन्वये गुन्हा दाखल आहे. त्यावर पथकास मिळालेल्या माहिती वरुन आरोपीचा शोध घेत श्री. तुळजाभवानी महाद्वार समोर आले असता पथकास एक इसम  संशईत रित्या फिरत असताना मिळून आला. त्यावर पथकाने त्यास ताब्यात घेवून  त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव- किरण शांताराम गुंजाळ, वय 24 वर्षे, रा.नुर कॉलनी बीड ता. जि. बीड असे सागिंतले.  पथकाने  त्याचेकडे सदर गुन्ह्या संदर्भात विचारपुस केली असता सदर इसमाने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली. यावरुन पथकाने त्याचे ताब्यातुन गुन्ह्यातील मोबाईल  हस्तगत करुन नमुद इसमास पुढील कारवाई कामी तुळजापूर पोलीसांचे ताब्यात दिले.

सदरची कामगीरी  पोलीस अधीक्षक संजय जाधव व  अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि वासुदेव मोरे, सपोनि सचिन खटके,अमोल मोरे,  पोलीस हावलदार विनोद जानराव, आश्विनकुमार जाधव, समाधान वाघमारे,  फरहान पठाण, पोलीस नाईक नितीन जाधवर, बबन जाधवर मपोह शैला टेळे, मपोकॉ रंजना होळकर, चालक पोकॉ गुरव, दहीहंडे, बोईनवाड  यांच्या पथकाने केली आहे.

 
Top