परंडा (प्रतिनिधी) -देशाच्या समुदतेमध्ये वन्यजीवांचे अतिशय महत्त्व आहे असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे. शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये व्यक्त केले.ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.
यावेळी व्यासपीठावर उपप्राचार्य डॉ.महेश कुमार माने, प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे, प्राणीशास्त्र विभागाचे प्रा डॉ शहाजी चंदनशिवे, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रकाश सरवदे, डॉ सचिन चव्हाण, गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.अक्षय घुमरे प्रा. जगन्नाथ माळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी केले. यावेळी बीएससी प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी निसर्गामधून लुप्त होत चाललेल्या वनस्पती व प्राणी या वन्य जीवांचे संरक्षण कसे करावे त्याची जनजागृती कशी करावी यासाठीचे पोस्टर्स प्राणीशास्त्र विभागामध्ये लावून ते मान्यवरांना सादर केले.
अध्यक्ष समारोप करताना प्राचार्य डॉ. सुनील जाधव म्हणाले की, अलीकडे मानव आणि वन्यजीवांमध्ये जगण्यातून संघर्ष निर्माण झाला आहे त्यामुळे पर्यावरणाची फार मोठी हानी होत असल्याने वन्यजीवांचा अधिवास धोक्यात आला आहे .
प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी वन्यजीव संवर्धन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले ते आपल्या मनोगत मध्ये म्हणाले की नामशेष होत चाललेल्या वन्यजीवांचे संरक्षण संवर्धन करून त्याबाबत जागृती करणे हा वन्यजीव सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे.वृक्षतोड नैसर्गिक संसाधनाचा अतिवापर तस्करी शिकारी रस्त्या अपघात जंगलातील रेल्वे रोड व वनवे इत्यादी वन्यजीव विनाशाची कारणे आहेत.
याप्रसंगी अनेक विद्यार्थ्यांनी वन्यजीव सप्ताह निमित्त प्राणीशास्त्र विभागामध्ये आकर्षक वन्यजीवांची पोस्टर्स लावूनवन्यजीवांचे जागृती करण्याचा प्रयत्न केला.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत देशमुख, धनंजय गायकवाड, वसंत राऊत यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बीएस्सी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.प्रीती शिंदे व कु . समिक्षा ठवरे यांनी केले तर आभार प्राणीशास्त्र विभाग प्रमुख डॉ अतुल हुंबे यांनी मानले.