धाराशिव (प्रतिनिधी)- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी चार निवडणूक निरीक्षकांची नेमणूक केली आहे. यामध्ये 240 - उमरगा आणि 241 - तुळजापूर विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून श्री.पंकज कुमार (97111 29044) आणि 242 - उस्मानाबाद आणि 243 - परंडा विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. गोपाल चांद (94180 65900) यांची तर जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक निरीक्षक (खर्च) म्हणून श्री.अलूरू व्यंकट राव (89859 72361) यांची आणि निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री.आर.एस. बेलवंशी (94251 58852) व (6363312584) यांची नेमणूक केली आहे.

 
Top