तुळजापूर (प्रतिनिधी)- 1957 साली हातामध्ये घेतलेला काँग्रेसचा झेंडा काँग्रेस पक्षाच्या चुकीच्या निर्णयामुळे आज माझ्यापासून दूर गेला आहे परंतु आपण या निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवू असा विश्वास काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी तुळजापूर येथे घेतलेल्या कार्यकर्ता मेळावा मध्ये व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघातील 4 हजार कार्यकर्ते उपस्थित होते.

तुळजापूर येथील श्रीनाथ लॉन्स येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ते मेळावामध्ये काँग्रेसचे नेते माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी उपस्थित कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेतल्या. आपण जर अखेरपर्यंत साथ देणार असाल तर आपण निश्चित ही निवडणूक लढवू आणि जिंकून दाखवू असे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर अशोक मगर, बाबुराव चव्हाण, मुकुंद डोंगरे, प्रकाश चव्हाण, शिवाजी गायकवाड, ऋषिकेश मगर, अझर मुजावर, रामचंद्र ढवळे, अशोक पाटील, सुजित हंगरगेकर, रामेश्वर तोडकरी, साधू मुळे, गौरीशंकर कोडगिरे,  रोहित पडवळ, लक्ष्मण सरडे, आशिष मोदानी, सुनील रोचकरी, नवाज काझी, सुभाष हिंगमिरे, अभिजीत चिवचिवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना चव्हाण म्हणाले कि, तुळजापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये निश्चितपणे मला बदनाम करून उमेदवारी मिळवण्यात यश मिळवले आहे. आपण कधीही कोणत्याही इतर पक्षाचा प्रचार केला नाही. तशा प्रकारचे स्पष्टीकरण त्यावेळी मी दिलेले आहे. तरी दखल मुंबई आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडे लेखी तक्रारी करून आपणास बदनाम करून उमेदवारी मिळवलेली आहे. याची दखल जनतेने घ्यावी असे आवाहन याप्रसंगी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले. या प्रसंगी अमर माने, रुषी मगर, अझहर मुजावर, नवाज काझी यांनीही निश्चितपणे या निवडणुकीत मधुकरराव चव्हाण विजयी होतील असे सांगितले. सभेचे सूत्रसंचालन सुजित हंगरगेकर यांनी केले व आभार माजी सभापती शिवाजी गायकवाड यांनी मानले.


 
Top