नळदुर्ग (प्रतिनिधी)- दिवाळी सणाच्या तोंडावर प्रवाशांची लुट करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यावर प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

फसध्या दिवाळीचा सण ऐन तोंडावर आला आहे त्यामुळे मुंबई, पुणे, अमरावतीसह इतर शहरात कामासाठी किंवा नोकरीसाठी असलेले किंवा आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्याकडुन सध्या मोठी लुट सुरु आहे. सर्वच ट्रॅव्हल्स कंपन्याच्या वतीने प्रवासी भाड्यात तीनपट वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे कंबरडे मोडले आहे. दिवाळी सणानिमित्त शहरात कामधंदा किंवा नोकरीसाठी असणारे नागरीक दिवाळी सण आपल्या मुळ गावी आपले आई –वडील व इतर नातेवाईकांसोबत दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी आपल्या गावी जातात. सध्या महाराष्ट्र राज्य परीवह महामंडळाच्या बस गाडयांना प्रचंड मोठया प्रमाणात गर्दी आहे. महिलांना अर्धे तिकीट तसेच जेष्ठ नागरीकांना अर्धे तिकीट तसेच 75 वर्षांपुढील नागरीकांना मोफत प्रवास यामुळे बस वाहतुकीवर कमालीचा तान आला आहे. त्यामुळे शहरातुन आपल्या गावी जाणारे प्रवासी जागा मिळण्याची कटकट नको म्हणुन खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणे पसंद करत आहेत याचाच गैरफायदा घेऊन विविध कंपाण्याचे खाजगी ट्रॅव्हल्सवाले उचलत आहेत. या खाजगी ट्रॅव्हल्स कंपन्यानी प्रवासी भाड्यात चक्क तीनपटीने वाढ केली आहे. ट्रॅव्हल्सवाल्यांच्या या प्रवासी भाडेवाडीला प्रशासनाने लगाम घालणे गरजेचे आहे. अव्वाच्या सव्वा भाडेवड करुन प्रवाशांची लुट करणाऱ्या ट्रॅव्हल्स कंपनीवर प्रशासनाने कडक कारवाई करुन त्यांचा वाहतुक परवाना रद्द करावा अशी मागणी होत आहे. दिवाळी सणापुवी सोलापुर ते अमरावती यासाठी ट्रॅव्हलसला प्रती शीट 800 रुपये इतके भाडे होते मात्र आता सोलापुर ते अमरावती यासाठी प्रती शीट ट्रॅव्हल्सवाले 2400 रुपये इतके भाडे घेत आहे. ही प्रवाशांची एकप्रकारे मोठी लुटच आहे. प्रशासनाने याप्रकारणी संबंधित ट्रॅव्हल्स कंपन्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे. सोलापुर ते अमरावती यासह उमरगा ते पुणे आणि उमरगा ते मुंबई या प्रवासासाठीही ट्रॅव्हल्स कंपण्याकडुन पुर्वीपेक्षा तीनपट भाडेवाढ करण्यात आली आहे. सणासुदुच्या दिवसात प्रवाशांची आर्थिक लुट करणाऱ्या खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स कंपन्यावर प्रशासनाने कडक करण्याबरोबरच या ट्रॅव्हल्स कंपन्यांचा प्रवासी वाहतुकीचा परवाना रद्द करावा अशी मागणी प्रवासी वर्गातुन होत आहे.

 
Top