तुळजापूर (प्रतिनिधी)-  तुळजापूर विधानसभा मतदार संघातील हंगरगा तुळ येथे शिवसेना बोगस मतदार यादीत नावे नोंद करण्यात आलेली आहेत.तरी ते रद्द करण्याची मागणी शिवसेनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.

हंगरगा (नळ) येथे बाहेरच्या मतदाराचे मतदान नोंद केले आहे. तरी विधानसभा मतदार संघात 410 मतदार केंद्र असुन प्रत्येक बुत वरील बोगस मतदाराची पडताळणी करण्यात यावी व आपल्या  शासकीय  कर्मचा-यांना योग्य सुचना देवून बोगस मतदारावर तात्काळ दंडात्मक कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात यावे. यावे अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इषारा वजा निवेदन जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी यांना अमोल जाधव यांनी दिले आहे.


 
Top