भूम, (प्रतिनिधी)- 'आई राजा उदो उदो'च्या गजरात नगर जिल्ह्यातून येणाऱ्या आई तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पलंगाचे भूम शहरात गुरुवार (ता.10) दुपारी साडेबारा वाजता आगमन झाले. यानिमित्त दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भूम येथील महादेव चव्हाण, गोवर्धन माळी, सुधाकर झील, महेश बागडे, बापू कुभार, आदी सेवेकरी हा मानाचा तुळजाभवानीचा पलंग डोक्यावर घेतात. नवव्या माळेला हा मानाचा पलंग तुळजापूर येथे पोहचतो.
दसरा सणासाठी परंपरेनुसार नगर जिल्ह्यातून भिंगार येथून देवीचा मानाचा पलंग भूम मार्गे आणण्याची प्रथा आहे. रविवारी अष्टमीला दुपारी बहऱ्हाणपूर, उळूप मार्गे कसबा विभागात मानाच्या पलंगाचे आगमन झाले. यानंतर हलगीच्या निनादात वाजत गाजत पेठ विभागातून गांधी चौक निराळे कुंठ येथून शाळु गल्ली मार्गे दत्तमंदिर समोरील सगरे यांच्या वाड्यासमोर एक तास विसावला. दुपारी आगमन होताच ठिकठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. गांधी चौक, दत्त मंदिर, कसबा विभाग येथे भाविकांनी गर्दी केली होती दुपारी नंतर शिवाजीनगर येथील मैदर्गे यांच्या घरासमोर आरती पूजा होवुन बार्शी मार्गे तुळजापूरकडे मालाचा पलंग मार्गस्थ झाला. हा पलंग डोक्यावर घेऊन जलद चालण्याची प्रथा आहे. पलंगासोबत मोठ्या संख्येन भाविक चालतात. पूजा होवुन बार्शी मार्गे तुळजापूरकडे मालाचा पलंग मार्गस्थ झाला.