धाराशिव (प्रतिनिधी) - हिंदुहृदयसम्राट स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन तसेच पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत शहाजी पवार यांच्यासह इतरांनी शिवसेना (ठाकरे) मध्ये दि.१० ऑक्टोबर रोजी जाहीर प्रवेश केला.
धाराशिव शहरातील पवनराजे कॉम्प्लेक्स येथे धाराशिव शहरातील सामाजिक कार्यकर्ते शहाजी पवार, अंकुश चौगुले, अनिल चौगुले, शिवाजी इटकर, प्रकाश गुजर, अमोल देवकर, सचिन साळुंके, अंकुश यमपुरे, शिवाजी जाधव व तानाजी जाधव या तरुणांनी शिवसेना (ठाकरे) मध्ये प्रवेश केला. खा राजेनिंबाळकर व आ पाटील यांनी त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, पंकज पाटील, लक्ष्मण जाधव, युवराज पवार आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.