धाराशिव (प्रतिनिधी)-उज्ज्वला कुलकर्णी  यांच्या पुढाकाराने व शताक्षी महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने अष्टमी निमित्त, अमेरिका येथील बहीण शिल्पा अजय डांगरे व  पुणे येथील अपर्णा पुराणिक आणि अश्विनी कुलकर्णी यांनी जिल्हा परिषद शाळा बालाजी नगर व जिल्हा परिषद शाळा शेकापूर येथील  दोन्ही शाळेत कन्या पूजन केले. यावेळी त्यांच्या मातोश्री रत्नमाला र् देशमुख ही आल्या होत्या. 

मुलींसाठी ज्वेलरी किट आणि शाळेतल्या सर्वांना खाऊ वाटप करण्यात आले. लोकमाता अहिल्याबाई यांच्या साडेतीनशेव्या जयंतीनिमित्त दोन्ही शाळांना अहिल्यादेवींच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या. उज्वला मसलेकर यांनी अहिल्याच्या गोष्टी हा विषय मांडला. या कार्यक्रमास शाळेचे सर्व पदाधिकारी व शिक्षक वृंद यांनी ही या उपक्रमाचे कौतुक केले आणि स्वतः कार्यक्रमाचे नियोजन करून सहकार्य केले. या कार्यक्रमास वर्षा आचार्य, अस्मिता बेंबळीकर, पुष्पा डोळे व इतर उपस्थित होत्या. प्रत्यक्ष हजर न रहाता आपल्या गावी एक सामाजिक बांधिलकीची जाणीव व कृतज्ञता व्यक्त करण्याची या भगिनींची ही पद्धत खरोखरचं कौतुकास्पद आहे.

 
Top