धाराशिव (प्रतिनिधी)- दिनांक 20 ते 29 सप्टेंबर यादरम्यान 53 महाराष्ट्र बटालियन एनसीसी लातूर यांच्यावतीने छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथे संयुक्त वार्षिक प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात
आले होते. या शिबिरामध्ये रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील एनसीसीच्या केडेटसनी घवघवीत यश प्राप्त केले. या कॅम्प साठी पाच मुली आणि पाच मुले असे एकूण दहा जणांची निवड झाली होती. यामध्ये तीन मुलींनी इंटर कंपनी व्हॉलीबॉल स्पर्धे मध्ये चॅम्पियनशिप जिंकून सुवर्ण पदक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचे कौतुक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख म्हणाले मुलींनी अतिशय दैदिप्यमान यश प्राप्त केले आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन असेच यश प्राप्त करत रहा.