नळदुर्ग (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने ब्राह्मण समाजाची अनेक वर्षापासुनची परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी पुर्ण करून परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. यानिमित्ताने 30 सप्टेंबर रोजी नळदुर्ग शहर ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमान्य वाचनालय जवळील गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. प्रारंभी 1993 च्या भुकंपात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यानंतर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी व सचिव मुकुंद नाईक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.यावेळी फटाक्याची आतिषबाजीही करण्यात आली. त्यानंतर ब्राह्मण समाजातील नागरीकांनी एकमेकांना साखर भरून तोंड गोड केले.त्यांनतर मुख्यबाजार पेठेत साखर वाटण्यात आली.यावेळी शहर ब्राह्मण समाज संघटनेचे अध्यक्ष विनायक अहंकारी,सचिव मुकुंद नाईक, उपाध्यक्ष प्रदीप ग्रामोपाध्याय,जेष्ठ नागरीक शशिकांत नाईक,बाबुराव वैद्य,गोविंद कुलकर्णी,वसंत अहंकारी,पांडुरंग कुलकर्णी,सुनिल किलजकर,उत्तम रामदासी,वसंत रामदासी,सुधीर पुराणिक,विनय परळकर,मुकुंद सांगवीकर,प्रमोद जोशी,अरुण जोशी,नंदकुमार जोशी, जितेंद्र मोरखंडीकर,मिलिंद कुलकर्णी,अनिल कुलकर्णी,विकास कुलकर्णीकल्याण कुलकर्णी,अनिल जोशी,अशोक केसकर,अनिल वैद्य,राजकुमार वैद्य, सुहास पुराणिक,किरण पाटील,सदानंद नाईक,मिलिंद भुमकर,प्रमोद कुलकर्णी,उमेश नाईक,सचिन भुमकर,ज्ञानेश्वर केसकर,संदीप वैद्य,वरद वैद्य,नितीन कुलकर्णी,सौरभ रामदासी,सन्नी भुमकर, प्रशांत जोशी,मयूर जोशी,सारंग जोशी,पुराणिक सुदर्शन, मनोज कुलकर्णी,प्रसन्ना कुलकर्णी,पार्थ कुलकर्णी,आनंद कमठाणकर, हनुमंत कुलकर्णी,सोनु गवळी उपस्थित होते.