तुळजापूर (प्रतिनिधी)- दर्शन मंडपातुन बोगदा मार्ग पायऱ्या वरुन भवानी शंकर दर्शन मंडपाकडे येणाऱ्या मार्गावर सुरक्षा रक्षक तैनात नसल्याने येथे भाविकांची एकच गर्दी होवुन वृध्द महिला, लहान मुले यांना ढकलाढकलीमुळे प्रचंड ञास सहन करावा लागत आहे.
श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ मंडपातुन धर्मदर्शन रांगेतुन येणाऱ्या भाविक खालच्या मजल्यावरुन भवानी शंकर मंडपाकडे पायऱ्या वरून येताना या तीन फुट जागेत एकदम भाविक एकञित येत येतात. येथे एकच गर्दी होवुन श्वाशोस्वास घेणे कठीण बनते. महिला, मुले यांना येथे ढकला ढकलीला सामोरे जावे लागते. येथे महिला भाविकांची मोठी कुंचबना होत असल्याने या कायम स्वरुपी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी होत आहे.