परंडा (प्रतिनिधी) -भारतीय जनता पार्टीचे विधानपरिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांना महाराष्ट्र विधानपरिषद शतक महोत्सवी कार्यक्रमात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते विधानपरिषदेतील “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल परंडा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने सत्कार करुन शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी वेदांताचार्य हभप. दत्तात्रय महाराज हुके, शिवव्याख्याते हभप. बालाजी महाराज बोराडे (झी टॉकीज फेम), किर्तनकेशरी हभप. सतीश महाराज कदम, उद्धव सस्ते, तात्यासाहेब आष्टेकर, राजकुमार घरत आदी उपस्थित होते.