तुळजापूर (प्रतिनिधी)-  राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे  माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांना गोळ्या घालून ठार मारणाऱ्या आरोपींना सन 2024 विधानसभा निवडणूक आचार संहिता सुरु होण्या अगोदर फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी समाजवादी पार्टी जिल्हा शाखेने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे निवेदन देवुन केली आहे.

बांद्रा मुंबई येथे माजी मंत्री व विद्यमान आमदार जिशान सिद्दिकी यांचे वडील बाबा सिद्दिकी यांना काल दिनांक 12/10/2024 रोजी सायंकाळ च्या सुमारास गोळ्या

घालून त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा आम्ही निषेध करतो. तसेच महाराष्ट्रातील याअल्पसंख्यांक नेत्याला वाय दर्जाची सुरक्षा असताना 15 दिवसापूर्वी धमकी देऊन गोळ्या घातल्या जातात. जीवे मारले जाते. महाराष्ट्र राज्यात कायदा सुव्यवस्था कोणत्या स्तरावर गेली आहे हे कळते.सदरील प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन  मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री व पोलीस प्रशासन यांनी सन 2024 विधानसभा निवडणूक आचारसंहिता सुरु होण्या अगोदर  आरोपींना फाशी द्यावी व सिद्दिकी परिवारास न्याय द्यावा व दिवसेंदिवस अल्पसंख्यांक समाजावर होणारे अत्याचार आपण खपवून घेणार नाहीत हे जनतेला दाखवून द्यावे. वरील प्रमाणे कार्यवाही करून अल्पसंख्यांक समाजाला कायदा सुव्यवस्था मजबूत आहे हा विश्वास द्यावा. असे जिल्हाध्यक्ष अमीर शेख यांनी  दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

 
Top