तुळजापूर  (प्रतिनिधी)- हिंदू धर्मिय नवराञोत्सवात मोठ्या प्रमाणात आपल्या स्ञीशक्ती देवतेचा कुलधर्म  कुलाचार करतात परंतु यंदा  कुलधर्म  कुलाचार करण्यासाठीचा महत्वाच्या साहित्य दरात मोठी वाढ झाल्याने यंदाचा कुलधर्म  कुलाचार करताना भाविकांच्या अर्थिक बजेटला फटका बसत आहे.

शारदीय नवराञ उत्सव काळात कुलधर्म, कुलाचार व धार्मिक विधीपुजासाठी लागणाऱ्या श्रीफळ, केळी सह अन्य साहित्य दर वाढल्याने यंदाच्या शारदीय नवराञ उत्सवात कुलदैवताचा कुलधर्मकुलाचार करणे ही खर्चिक झाला असुन याचा फटका भाविकांना अर्थिक रुपाने बसत आहे.

मागील महिन्यात श्रीफळ वीस रुपयाला होते ते आता पन्नास रुपयांन वर गेले आहे. तसेच केळी दर वीस रुपये डझन होते ते पन्नास ते साठ रुपयांन वर गेले आहे. तसेच खायचे पाने, खारीक, सुपारी, हळकुंड, हळदकुंकु, विविध फळ, पंचामृतसाठी लागणारे दही दुध यांचे दर अचानक शारदीय नवराञ पुर्वी दोन दिवस वाढल्यामुळे भाविकांना याचा फटका अर्थिक रुपात बसत आहे. महाराष्ट्रात नवराञोत्सवात साडेतीन शक्ती पीठीन सह घरोघरी कुलदेवतेची नऊ दिवस  कुलधर्म कुलाचार उपासना करण्यासाठी  पुजाअर्चा केली जाते. यावेळी खास देविभक्त उपवास करतात या उपवाससाठी लागणाऱ्या शाबुदाना भगर, शेंगदाने, पेडखजुर  यांच्या दरात ही वाढ झाली आहे. याचा परिणाम घरोघरी व तिर्थक्षेञी कुलधर्म, कुलाचार, धार्मिक पुजा करताना घरातील नवराञोत्सवातील अर्थिक बजेटला फटका बसत आहे. शेतमाल भाव कमी हाच माल व्यापारी वर्गाकडे दाखल होताच त्याला भाव असे समीकरण बनल्याने सध्या याचा फटका महिलावर्ग व शेतकऱ्यांना अर्थिक रुपात बसत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील साडेतीन शक्ती पिठात कुलधर्मकुलाचार करण्यासाठी जाणारा भाविक माता देवी महागाई कमी होवू दे असे साकडे घालत आहे.

 
Top