तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजाभवानीचा अश्विनी पौर्णिमेचा राञी छबिना काढण्यात आल्यानंतर महंत तुकोजीबुवांनी गुरुवारी (दि. 17) रात्री जोगवा मागितल्यानंतर गेली पंधरा दिवसापासुन सुरु असलेल्या मंगलमय सोहळ्याचा समारोप झाला. या शारदीय नवराञ उत्सव सोहळ्याचा सांगता झाला.
तुळजाभवानी मंदिरात गुरुवारी रात्री आठ वाजता सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह छबिना मिरवणूक काढण्यात आली. नंतर तुळजाभवानीचे महंत तुकोजीबुवा
यांनी अश्विनी पौर्णिमे दिनी आपल्या उपरण्यात जोगवा मागितला. यावेळी जिल्हाअधिकारी डाँ सचिन ओम्बासे, तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशासन अधिकारी माया माने सह प्रक्षाळ पुजेचे सेवेकरी, भाविक मोठ्या संखेने उपस्थितीत होते.