तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर विधानसभा मतदार संघा बाबतीत निर्णय महाविकास  आघाडी समन्वय समिती घेईल असे वक्तव्य काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी शनिवारी महानवमी दिनी श्रीतुळजाभवानी दर्शनार्थ आले असता दिल्याने या वक्तव्या मागे काय अर्थ दडलय याचा उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे ही जागा कुणाकडे जाणार, कोन उमेदवार असणार या बाबतीत आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

तुळजापूर विधानसभा मतदार संघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला पण  मागील निवडणुकीत ही जागा काँग्रेसकडुन भाजपकडे गेल्यामुळे व लोकसभेत येथुन शिवसेनेला 52 हजारची लीड मिळाल्याने व शरद पवार ही जागा आपल्या घेण्यासाठी तयारीत असल्याने या  विधानसभा निवडणुक बाबतीत महाविकास आघाडीतील पक्ष व उमेदवार बाबतीत प्रचंड अनिश्चितता वाढली आहे.

सध्या महाविकास आघाडीतील तिन्ही  घटक पक्षांनी आपआपल्या वरिष्ट नेत्यांकडे जागे बाबतीत आग्रही मागणी केली आहे. तिन्ही पक्षात इच्छुक संख्या मोठी असुन त्यांनी मागील काही महिन्यापासुन मतदारांमध्ये जावुन प्रचार ही सुरु केला आहे. तिन्ही घटक पक्षातील इच्छुक जागा आमच्याकडे राहणार व वरिष्ठांनी कामाला लागा अशा सुचना दिल्याने आम्ही प्रचार करीत आहोत. त्यामुळे तुळजापूर विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडी कडे कुणाचा वाटेला जाणार? कुणाला उमेदवारी मिळणार या बाबतीत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

काँग्रेस नंतर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस  (शरद पवार गट ) कडे जाणार असल्याची चर्चा सध्या वेगाने होत आहे. पुण्यातील एक उद्योगपती हाती तुतारी घेणार असुन त्याचा एकमेव्य जावयाला ही जागा दिली जाणार असल्याची चर्चा राजकिय पटलावर चर्चली जात आहे. पुणे येथील उद्योजक प्रवेशानंतर माञ येथील जागे बाबतीत मोठी राजकिय घडामोड घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या जावयाचे भाजप मधील समर्थक भाजप संबधितांचा ग्रुपवर जिथे किंमत नाही तिथे थांबायचे नसते. आपण संयमी आहोत म्हणून आपली दखल घेत नाही. या सह अनेक नाराजीचा पोस्ट अचानक पडणे सुरु झाल्याने विधानसभा मतदार संघात मोठी राजकिय घडामोड शक्यता वर्तवली जात आहे. एकंदरीत तुळजापूर विधानसभा मतदार संघ पक्ष उमेदवार निवडी बाबतीत शरद पवारांची भूमिका महत्त्वाची असणार असल्याची चर्चा महाविकास आघाडीतील नेते मंडळीत चर्चिली जात आहे.

 
Top