तुळजापूर (प्रतिनिधी) - श्रीतुळजाभवानी मातेच्या अश्विनी पोर्णिमे दिनी गुरूवारी (दि17) आर आर किराड परीवार वतीने देविजींचे गर्भगृह ते महाध्दार असे संपुर्ण मंदीर परिसरात देशी विदेशी सहा हजार किलो फुलांचा आरास असणारी फुलरुपी सेवा केली आहे.
या फुलांच्या आरासात मयुरवर देवि स्वार व पार्वती शंकराला दिक्षा देतानाचे अविस्मयणीय प्रसंग फुलातुन साकारले होते.मागील दहा वर्षापासून किराड परीवार फुलआरास रुपी सेवाकरीत आहेत. सदरील फुलांचा आरास पुणे येथुन ऐंशी टक्के तयार करुन आणला असुन मंदीरात ते बसविण्यासाठी नव्वद कामगारांना 36तास लागले. या आरास फुलात तीनशे लक्ष्मी कमळ पांढरे व पिंक गुलाब, डच गुलाब तीन हजार बंडल, आँर्कीड शंभर बडल त्यात पन्नास बंडल पांढरे अँयोरिऐयम चारशे ते पाचशे पाने, झेंडु पिवळा, आँरेज तिन हजार किलो शेवंती, पांढरी दीड हजार, पिवळी एक हजार किलो. परपल पाचशे, टायगर कलर पाचशे किलो, ग्रेनरी तीनशे बंडल, स्पन पन्नास बंडल, गुलछडी अदि फुलांचा यात वापर केला आहे. हा फुलांचा आरास सुभाष सरपाले यांच्या मार्गदर्शन खाली तीन दिवस नव्वद सहकार्यानी केला