तुळजापूर (प्रतिनिधी) - तिर्थक्षेत्र तुळजापूर येथील विश्ववंध छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यामध्ये स्वताःच्या प्रसिध्द लावलेले बॅनर शिवप्रेमींच्या तक्रारी नंतर नगरपरिषदेने काढुन जप्त केले.
श्रीतुळजाभवानी शारदीय नवराञ महोत्सव पार्श्वभूमीवर चमकोमंडळी भाविकांच्या मदतीसाठी काहीही न करता स्वताचे बँनर लावत सुटले आहेत. यात ते महामानवांच्या पुतळ्याला ते सोडण्यास तयार नाहीत. विशेष म्हणजे छञपती शिवाजी महाराज पुतळा परिसर लावलेले बँनर नगरपरिषदेनला कळाले सुध्दा नाही कि कळुन ही ते कोणत्या कारणामुळे गप्प बसले हे अद्याप कळाले नाही. या घटनेमुळे छञपती शिवाजी महाराज पुतळा सुरक्षेचे काय? असा सवाल होत आहे. या पार्श्वभूमीवर सदरील बँनर लावणाऱ्यावर नगरपरिषद मुख्याधिकारी लक्षमण कुंभार यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे.