तुळजापूर (प्रतिनिधी)-  विकसित भारतासाठी विद्यार्थ्याच्या नाविन्यपूर्ण संकल्पना व योगदान दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन  तुळजापूर कॅम्पसचे संचालक प्रा. डॉ. बाळ राक्षसे यांनी केले. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, तुळजापूर कॅम्पसच्या बीए समाजकार्य व समाजशास्त्र 2024-2028 या शैक्षिणक वर्षाच्या बॅचचे उदघाटन प्रा. डॉ. बाळ राक्षसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कॅम्पसचे माजी संचालक प्रो रमेश जारे, डॉ. के. पी. मनोजन, सस्मिता स्वाईन, डॉ. गजानन हिवाळे, देविदास कदम हे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. बाळ राक्षसे म्हणाले की, नवीन शैक्षिणक धोरणा अंतर्गत राबविण्यात येणारी बीए समाजकार्य व समाजशास्त्र या कोर्ससाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याची ही पहिलीची बॅच आहे. समुदाय प्रतिबद्धतेच्या (कम्यूनिटी एन्गेजमेन्टच्या) माध्यमातून नवीन शैक्षिणक धोरण शिक्षित भारतासाठी व विकसित भारतासाठी महत्वपूर्ण आहे. येणाऱ्या काळामध्ये टाटा सामाजिक संस्था ही क्षेत्रकार्य कृती प्रकल्पांच्या, संशोधन प्रकल्पांच्या व कम्यूनिटी एन्गेजमेन्टच्या माध्यमातून प्राध्यापक, सोशल वर्कस्‌‍ व विद्यार्थी यांच्याकडे असलेल्या नाविन्यपूर्ण नवं संकल्पना, विविध विषयातील ज्ञान, अनुभव व कौशल्ये याचा उपयोग लोकसहभागाच्या माध्यमातून गाव विकास करण्यासाठी व विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रहिताच्या जबाबदारीची व सामाजिक उत्तरदायित्वाची भावना वाढीस लागण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

याप्रसंगी कॅम्पसचे माजी संचालक प्रो. रमेश जारे म्हणाले की, शैक्षिणक संस्था व विद्यापीठे हे विकासाचे केंद्रबिंदू असून शिक्षण हे विद्यार्थ्याना सजग नागरीक बनविण्यासाठी महत्वपुर्ण असून त्यादृष्टीने टाटा सामाजिक संस्था काम करत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. श्रीधर सामंत यांनी केले व आभार डॉ. गजानन हिवाळे यांनी मानले.


 
Top