तुळजापूर (प्रतिनिधी) - जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धाराशिव वतीने  तुळजाभवानी क्रीडा संकुल येथे घेण्यात आलेल्या लांब उडी स्पर्धत शिंदे प्रशालेचा पृथ्वीराज जीवनकुमार वाकळे यांनी  प्रथम क्रमांक पटकावल्याने त्याची नांदेड येथे होणाऱ्या विभाग स्तरीय स्पर्धसाठी निवड झाली.

या स्पर्धेत सुमारे 240 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. लांब उडी या क्रीडा प्रकारात जिल्ह्यातील एकूण सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल तुळजापूर इयत्ता आठवीत शिकत असलेला पृथ्वीराज जीवन कुमार वाकळे या विद्यार्थ्याने सर्वोच्च 4.85 इतकी लांब उडी मारून प्रथम क्रमांक मिळवला व त्याची नांदेड येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. जिल्हा क्रीडा कार्यालय यांनी विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक राजशेखर एल. गुंडे, पर्यवेक्षक मुरूमकर, कुंभार ओ. डी., घोरपडे, घोडके, हुंडेकरी, क्षीरसागर सर, खराटे, सर्व शिक्षिका, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थ्याला क्रीडाशिक्षक श्री आदटराव लालासाहेब यांनी मार्गदर्शन लाभले.

 
Top